मुंबईत लाडक्या बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे फक्त अन् फक्त गणेशभक्तच

| Updated on: Sep 17, 2024 | 4:23 PM

राज्यभरात गेल्या दहा दिवस जल्लोषात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची आज सांगता होणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईतील लालबाग-परळमध्ये सध्या गणेश भक्तांचा महापूर आल्याचे पाहायला मिळत आहे.

Follow us on

गेले दहा दिवस गणेशोत्सवात लाडक्या बाप्पांची मनोभावे पूजा, भक्ती आणि सेवा केल्यावर आज गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. मुंबईत सकाळपासूनच गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. मुंबईतील परळ, लालबागमधील रस्ते आज गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. आज सकाळी ९:३० वाजता विधिवत पूजा आणि आरती करण्यात आल्यानंतर लालबागच्या राजाची राजेशाही विसर्जन मिरवणूक सकाळी ११ वाजता लालबाग मार्केटमधून निघाली. तेव्हापासूनच मुंबईकरांसह भाविकांनी आपल्या राजाला शेवटचं डोळेभरून पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे. सध्या लालबागमधील रस्ते गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून गेल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील भारतमाता सिग्नल ते श्रॉफ बिल्डिंग परिसरात जिकडे नजर तिकडे फक्त अन् फक्त गणेशभक्तच पाहायला मिळत आहे. जगभरात ख्याती असलेल्या लालबागच्या राजासह मुंबईचा राजा आणि इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाच्या मिरवणुका विसर्जनस्थळी मार्गस्थ होताय.