मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताय? मग ही बातमी वाचा, ‘या’ तीन दिवशी वाहतूक बंद
Mumbai-Goa Highway Big News : मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. गेली कित्येक वर्ष रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग अद्यापही खडतर अवस्थेत आहे. मुंबई महामार्गावर अनेक भागात फ्लायओवर पुलांची कामे सुरू आहेत. पुलाच्या कामाचे गर्डर बसविण्याकरीता महामार्ग बंद ठेवण्यात येणार
Mumbai – Goa महामार्गावर कोलाडजवळ 11 ते 13 जुलैदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. गेली कित्येक वर्ष रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग अद्यापही खडतर अवस्थेत आहे. मुंबई महामार्गावर अनेक भागात फ्लायओवर पुलांची कामे सुरू आहेत. पुलाच्या कामाचे गर्डर बसविण्याकरीता महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक ही काही दिवस बंद राहणार आहे. आता हे गर्डर बसविताना मुंबई महामार्गावर पुढील वेळापत्रकानुसार महामार्ग बंद राहणार आहे. दिनांक 11 जुलै रोजी सकाळी 6 ते 8 या वेळेत आणि दुपारी 2 ते 4 ब्लॉक घेण्यात येणार आहे. दिनांक 12 जुलै रोजी सकाळी 6 ते 8 या वेळेत आणि दुपारी 2 ते 4 या वेळेत तर दिनांक 13 जुलै रोजी सकाळी 6 ते 8 या वेळेत आणि दुपारी 2 ते 4 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Published on: Jul 10, 2024 05:43 PM