Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरून आजपासून ‘या’ वेळात प्रवास करता येणार नाही, कारण नेमकं काय?
11 ते 13 जुलैदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान, कोलाडजवळील पुई परिसरात नवीन पुलाचा गर्डर टाकण्याचं काम करण्यात येणार आहे. पुलाच्या कामाचे गर्डर बसविण्याकरीता महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक ही काही दिवस बंद राहणार आहे.
Mumbai – Goa महामार्गावर आजपासून तीन दिवस वाहतूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण 11 ते 13 जुलैदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान, कोलाडजवळील पुई परिसरात नवीन पुलाचा गर्डर टाकण्याचं काम करण्यात येणार आहे. पुलाच्या कामाचे गर्डर बसविण्याकरीता महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक ही काही दिवस बंद राहणार आहे. आता हे गर्डर बसविताना मुंबई महामार्गावर पुढील वेळापत्रकानुसार महामार्ग बंद राहणार आहे. दिनांक 11 जुलै रोजी सकाळी 6 ते 8 या वेळेत आणि दुपारी 2 ते 4 ब्लॉक घेण्यात येणार आहे. दिनांक 12 जुलै रोजी सकाळी 6 ते 8 या वेळेत आणि दुपारी 2 ते 4 या वेळेत तर दिनांक 13 जुलै रोजी सकाळी 6 ते 8 या वेळेत आणि दुपारी 2 ते 4 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Published on: Jul 11, 2024 12:02 PM