Kishori Pednekar | मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नाही : किशोरी पेडणेकर
मुंबईतील 42 लाख सामान्य नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तर 82 लाख नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. सध्याचा केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात सुरु असल्याने लसीकरण मोहीम पूर्ण वेगात सुरु आहे.
राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका उरलेला नाही, असा दावा मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आला आहे. महानगरपालिकेने उच्च न्यायालयात तशी माहिती दिली. मुंबईत अंथरुणाला खिळलेल्या 2586 नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर 3942 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
याशिवाय, शहरातील 42 लाख सामान्य नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तर 82 लाख नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. सध्याचा केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात सुरु असल्याने लसीकरण मोहीम पूर्ण वेगात सुरु आहे. त्यामुळे एकंदर परिस्थिती पाहता मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नाही, असे पालिकेने न्यायालयात सांगितले.