Mumbai Heavy Rain | मुसळधार पावसाचा रेल्वे-रस्ते वाहतुकीला फटका, मुंबईकरांचे हाल
दादर, हिंदमाता, सायन किंग्ज सर्कल येथे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. अनेक भागांमध्ये दीड ते दोन फूटांपर्यंत पाणी साचलं होतं. यामुळे दुचाकी आणि चारचाकींचे टायर देखील पाण्याखाली गेले होते तर सकाळी ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांची पावसाने चांगलीच तारांबळ उडवली. त्यामुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे.
हवमान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबई शहरासह उपनगरात रात्रीपासून पावसाचं धुमशान पहायला मिळत आहे. दादर, हिंदमाता, सायन किंग्ज सर्कल येथे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. अनेक भागांमध्ये दीड ते दोन फूटांपर्यंत पाणी साचलं होतं. यामुळे दुचाकी आणि चारचाकींचे टायर देखील पाण्याखाली गेले होते तर सकाळी ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांची पावसाने चांगलीच तारांबळ उडवली. त्यामुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य, हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे तर रस्ते वाहतूकही मंदावली आहे. वेस्टर्न, ईस्टर्न हायवेवर अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे.| Mumbai Heavy Rain Railway and road Transportation slows down