Mumbai Rain | मुंबईला पावसाने झोडपलं; अनेक ठिकाणी पाणी साचलं, रेल्वेची वाहतूक कोलमडली
मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. रात्रभर मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे रस्त्यांना नद्यांचा स्वरुप आलेले पाहायला मिळालं.
मुंबईत रात्रभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या पाच ते सहा तास तुफान पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. रात्रभर मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे रस्त्यांना नद्यांचा स्वरुप आलेले पाहायला मिळालं. सखल भागात पाणी साचलंय. अनेक ठिकाणी गाड्या पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं तर सकाळी वाहतूक कोंडीही झालेली पाहायला मिळत आहे. (Mumbai heavy Rain Waterlogging in many area)