Shilpa Shetty | अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या मागण्या हायकोर्टाने फेटाळल्या
शिल्पा शेट्टी हिने मुंबई हायकोर्टात सिव्हिल सूट दाखल केला होता. या याचिकेत तिने काही महत्त्वाच्या मागण्या केल्या होत्या. या प्रकरणी आज (30 जुलै) सुनावणी पार पडली. यात शिल्पाच्या सगळ्या मागण्या फेटाळून लावण्यात आल्या.
अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी राज कुंद्रा यांना अटक केली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ही त्याची पत्नी आहे. त्यामुळे राज याला अटक केल्यानंतर या प्रकरणाशी शिल्पा हिचाही संबंध लावला जात आहे. मात्र, या घटनेशी आपला काहीही संबंध नाही, असं शिल्पा सांगत आहे. यानंतरही तिच्या विरोधात काही चॅनेल आणि युट्यूब चॅनेलवर शिल्पा हिचा संबंध लावून बातम्या येत आहेत. या विरोधात शिल्पा शेट्टी हिने मुंबई हायकोर्टात सिव्हिल सूट दाखल केला होता. या याचिकेत तिने काही महत्त्वाच्या मागण्या केल्या होत्या. या प्रकरणी आज (30 जुलै) सुनावणी पार पडली. यात शिल्पाच्या सगळ्या मागण्या फेटाळून लावण्यात आल्या. शिल्पा शेट्टीला सध्या कोणताही अंतरिम दिलासा देता येणार नाही, असं हायकोर्टनं म्हटलं आहे.