VIDEO : Mumbai हायकोर्टाचा नवाब मलिकांना दणका
ईडीच्या कारवाईला विरोध करणारी नवाब मलिक यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मलिक यांनी ईडीच्या कारवाईला विरोध करणारी याचिका केली होती. ईडीकडून आपल्याला बेकायदेशीरपणे अटक करण्यात आल्याचा दावा मलिक यांनी या याचिकेतून केला होता. त्यावर कोर्टाने मलिक यांना फटकारले आहे.
ईडीच्या कारवाईला विरोध करणारी नवाब मलिक यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मलिक यांनी ईडीच्या कारवाईला विरोध करणारी याचिका केली होती. ईडीकडून आपल्याला बेकायदेशीरपणे अटक करण्यात आल्याचा दावा मलिक यांनी या याचिकेतून केला होता. त्यावर कोर्टाने मलिक यांना फटकारले आहे. अटक बेकायदेशीर असल्याचा मलिक यांचा दावा चुकीचा असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. कोर्टाच्या या निर्णयाने नवाब मलिक यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मलिक आता कोणत्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, मलिक यांना रितसर जामीन अर्ज करण्याचा पर्याय खुला असल्याचंही कोर्टाने म्हटलं असून त्यामुळे मलिक यांना दिलासा मिळाला आहे.