परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं…, कंपनीनं मोडला नियम, दुर्घटनेच्या दिवशीच पालिकेची नोटीस

| Updated on: May 14, 2024 | 2:07 PM

घाटकोपर येथे कोसळलेल्या भल्या मोठ्या होर्डिंग शेजारी संबंधित कंपनीचे आणखी ३ मोठे होर्डिंग लावण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. अशा बेकायदेशीर होर्डिंगवर प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. घाटकोपरच्या छेडा नगर परिसरात सोमवारी संध्याकाळी एका पेट्रोल पंपाच्या छतावर भलंमोठं होर्डिंग कोसळलं.

Follow us on

घाटकोपरच्या छेडा नगर परिसरात सोमवारी संध्याकाळी एका पेट्रोल पंपाच्या छतावर भलंमोठं होर्डिंग कोसळलं. घाटकोपरमधील कोसळलेलं होर्डिंग हे मुंबईतील सर्वांत मोठं होर्डिंग असून कोसळलेल्या होर्डिंगची उंची १२० बाय १२० फूट असल्याची माहिती समोर येत आहे. तर होर्डिंग लावणाऱ्या कंपनीकडून आकारमानाच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेच्या नियमानुसार ४० बाय ४० फुटांपर्य़ंतच होर्डिंग लावण्याची परवानगी या होर्डिंग लावणाऱ्या कंपनीला देण्यात आली होती. दरम्यान, घाटकोपर येथे कोसळलेल्या भल्या मोठ्या होर्डिंग शेजारी संबंधित कंपनीचे आणखी ३ मोठे होर्डिंग लावण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. अशा बेकायदेशीर होर्डिंगवर प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. इगो मीडिया या कंपनीच्या नावाचं हे होर्डिंग होतं. पालिकेने ही दुर्घटना घडण्याच्या दिवशीच कंपनीला नोटीस दिली होती. ६ कोटी १३ लाखांचा दंड भरण्याचे आदेश पालिकेने नोटीसद्वारे कंपनीला दिले होते. पालिकेने बजावलेल्या नोटीसमध्ये आणखी काय म्हटलंय बघा…