VIDEO : Kurla मधील दुकानांची ED कडून पाहणी
ईडीच्य़ा अधिकाऱ्यांच्या एका पथकाने कुर्ल्यात छापेमारी सुरू केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांचं एक पथक आज सकाळीच कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडजवळ पोहोचंल आहे. या ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी एका वयस्क व्यक्तींकडील कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे.
ईडीच्य़ा अधिकाऱ्यांच्या एका पथकाने कुर्ल्यात छापेमारी सुरू केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांचं एक पथक आज सकाळीच कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडजवळ पोहोचंल आहे. या ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी एका वयस्क व्यक्तींकडील कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. गोवा कंपाऊंड जवळच्या भूखंडाप्रकरणीच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे मलिक प्रकरणाशी संबंधित माहिती मिळवण्यासाठीच ईडीने ही छापेमारी सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे ईडीच्या हाती काय माहिती लागते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, नवाब मलिक यांना ईडीने ताब्यात घेतलेलं असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे आजच्या या छापेमारीमुळे मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.