VIDEO : रोजच्या आरोपांनी Disha Salian चे आई-वडील दुखी, घरात वृत्तपत्रही आणत नाहीत -Kishori Pednekar

| Updated on: Feb 22, 2022 | 2:13 PM

दिवंगत अभिनेता सुशांत सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियान  हिच्या मृत्यूवरून भाजप नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा आरोप केले आहेत. दिशा सालियान हिच्यावर बलात्कार होत असताना फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक होते, असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलाय, यामुळे दिशा सालियानच्या कुटुंबाला आणखी जबरदस्त धक्का बसला आहे.

दिवंगत अभिनेता सुशांत सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियान  हिच्या मृत्यूवरून भाजप नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा आरोप केले आहेत. दिशा सालियान हिच्यावर बलात्कार होत असताना फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक होते, असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलाय, यामुळे दिशा सालियानच्या कुटुंबाला आणखी जबरदस्त धक्का बसला आहे. अशा बातम्यांमुळे या कुटुंबाला त्रास होत असून यापुढे त्यांना त्रास देऊ नका, अशी विनंती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. किशोरी पेडणेकर यांनी आज दिशा सालियान यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. दिशाच्या मृत्यूनंतर आणि यासंबंधीच्या बातम्यांमुळे कुटुंबावर मोठं संकट कोसळलं असून समाजातूनही त्यांना नाकारलं जात आहे. त्यामुळे कृपा करून आता त्यांना फार त्रास देऊ नका, अशी हात जोडून विनंती किशोरी पेडणेकर यांनी केली.

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 22 February 2022
VIDEO : Fast News | 1 PM | महत्वाच्या बातम्या | 22 February 2022