लोकलमधून उतरताच प्लॅटफॉर्मवरून प्रवाशी धावत सुटले… घाबरू नका, बघा अंधेरी स्थानकात नेमकं काय झालं?

| Updated on: Jul 18, 2024 | 4:33 PM

मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील रेल्वे वाहतुकीला बसल्याने सकाळच्या वेळातच नागरिकांचा संताप झाला. दरम्यान, अंधेरीसह मुंबई उपनगरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली असताना मुंबईतील एका रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांची एकच धावाधाव पाहायला मिळाली. नेमकं काय झालं?

मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने मुंबईला यलो अलर्ट जारी केला आहे. अशातच मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील रेल्वे वाहतुकीला बसल्याने सकाळच्या वेळातच नागरिकांचा संताप झाला. दरम्यान, अंधेरीसह मुंबई उपनगरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली असताना अंधेरी स्थानकावर रेल्वे प्रवाशांची एकच धावाधाव पाहायला मिळाली. अंधेरी स्टेशनवर ट्रेनमधून उतरल्यानंतर लोक धावताना दिसले. अंधेरी स्थानकावर छत नसल्याने रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊन मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. मुंबई रेल्वेच्या डब्ब्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. मात्र रेल्वे स्थानकावर प्रवाशांना कोणतीही सोय करण्यात आली नाही. मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय. अशातच अंधेरी स्थानकावर ट्रेन आल्यानंतर स्थानकावर कोणतेही पत्रे नसल्याने पावसात भिजू नये म्हणून प्रवाशी सुसाट धावताना दिसताय.

Published on: Jul 18, 2024 01:21 PM
Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? हवामान खात्याचा बघा अंदाज
‘लाडक्या बहिणी-भावा’वरून राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, शिंदेंच्या बहिणीचं, सुनेचं घर…