Mumbai Mega Block | मुंबईकरांनो… रविवारी घराबाहेर पडताय? ट्रेनचं वेळापत्रक बघूनचं करा प्रवास
VIDEO | रविवारी घराबाहेर पडताय? मुंबई लोकलचं वेळापत्रक जाणून घेऊनच मुंबई लोकलने प्रवास करा...कोणत्या मार्गावर असणार मेगाब्लॉक?
मुंबई, ५ ऑगस्ट २०२३ | मुंबईकरांनो… उद्या रविवारी तुम्ही घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल? तुमचा मुंबई लोकलने घराबाहेर जाण्याचा विचार असेल तर ही बातमी आणि व्हिडीओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. मध्य रेल्वेवरील रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीसाठी उद्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकात काहीसा बदल असणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते ठाणे दरम्यान उप आणि डाउन धिम्या मार्गवर सकाळी 8.30 ते दुपारी 1.30 पर्यत असणार आहे तर पश्चिम रेल्वेवर मरीन लाईन्स ते माहीम दरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 पर्यत ब्लॉक घेण्यात येईल. तर हार्बर मार्गांवर ही उद्या ब्लॉक असणार आहे कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Published on: Aug 05, 2023 12:45 PM