Mumbai Local Mega Block Video : मुंबईकरांनो… लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वतीने रविवारी १६ मार्च २०२५ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही आज लोकल ट्रेनने प्रवास करणार असाल तर हा व्हिडीओ तुम्ही नक्की बघा आणि तसं नियोजन करा. मध्य रेल्वेच्या मेनलाईन आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते कल्याण रेल्वे स्टेशनवर सकाळी ११ वाजेपासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान, देखभाल आणि दुरूस्तीची कामं करण्यात येणार आहे. यासह ट्रान्स हार्बर मार्गावर नेरूळ ते पनवेल लोकल सेवा या ब्लॉकदरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे. तर या ब्लॉक दरम्यान वाशी ते पनवेल दरम्यानची लोकल वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही मेगाब्लॉक नसल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मात्र दिलासा मिळणार असून या ब्लॉक काळात सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील. मध्य आणि हार्बर मार्गाच्या उपनगरीय रेल्वे मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीकरिता काम केले जाणार असल्याने मुंबईकरांचा आज खोळंबा होणार आहे. आज घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे नियमित फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून सर्व उपनगरीय सेवा किमान 15 मिनिटे उशिराने धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.