Mumbai Local News | तुम्ही रेल्वेने प्रवास करता का? तुमच्यासाठी मोठी बातमी, आता दादर लोकल बंद?
VIDEO | मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी, दादर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 1 आणि 2 वरील प्रवाशांच्या गर्दीची कोंडी लवकरच फुटणार आहे, कशी ते बघा?
मुंबई, १३ सप्टेंबर २०२३ | मुंबईकरांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही मुंबई लोकलने प्रवास करत असाल तर ही बातमी नक्कीच वाचा तुमची गैरसोय होणार नाही. दादर लोकल आत्ता परेल स्थानकामधून सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 आणि 2 वरील गर्दीची कोंडी लवकरच फुटणार आहे. रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 च्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. यामुळे 15 सप्टेंबरपासून दादरहून सुटणा-या लोकल्स परळमधून सुटणार आहेत. दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 हा रुंदीने छोटा आहे. मात्र, येथून धीम्या लोकल जात असल्याने येथे नेहमीच प्रवाशांची तुंडूब गर्दी असते. यामुळे अपघाताची देखील भिती असते. यामुळेच मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म क्रमांक 1 च्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे.