Mumbai Local Mega Block Update : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आज लोकल ट्रेनने प्रवास करताय? नेमका कुठे मेगाब्लॉक?

| Updated on: Jun 23, 2024 | 10:18 AM

तुम्ही आज घराबाहेर पडत असाल आणि विशेषतः ट्रेनने प्रवास करत असाल तर मुंबईची लाईफ-लाईन असणाऱ्या लोकल ट्रेनचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. कारण आज रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी नेमका ब्लॉक कसा आहे हे जाणून घ्या...

मुंबईकरांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. कारण तुम्ही आज घराबाहेर पडत असाल आणि विशेषतः ट्रेनने प्रवास करत असाल तर मुंबईची लाईफ-लाईन असणाऱ्या लोकल ट्रेनचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. कारण आज रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी या मार्गावर सकाळी साडे दहा ते दुपारी साडे तीन वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन रेल्वेमार्गावर ब्लॉक असणार आहे. तर पश्चिम मार्गावरील माहिम ते गोरेगाव अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे गोरेगावला जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी नेमका ब्लॉक कसा आहे हे जाणून घ्या…

Published on: Jun 23, 2024 10:18 AM
पोलिस भरती, पेपरफुटी प्रकरणी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रास्ता रोको
सगेसोयरे, सरसकट मिळणार की नाही? आरक्षणावरुन पुन्हा भुजबळ अन् जरांगे आमने-सामने