50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2.30 PM | 9 August 2021

| Updated on: Aug 09, 2021 | 3:17 PM

राज्य सरकारने येत्या 15 ऑगस्टपासून कोव्हिडचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी 8 ऑगस्टला जनतेशी संबोधित करताना, याबाबतची माहिती दिली.

मुंबईमध्ये लोकल रेल्वे प्रवासासाठी दोन डोस घेतलेल्यांना महापालिका किंवा राज्य सरकारकडून फोटो पास देण्यात आल्यानंतर 15 ऑगस्टपासून प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे. दरम्यान या निर्णयानंतर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेते रावसाहेब दानवेंनी या निर्णयावर बोलताना राज्य सरकारने रेल्वे विभागाशी एकदा चर्चा करायला हवी होती असे म्हटले आहे.

लोकलचा फॉर्म्युला धार्मिक स्थळ, मॉलसाठी लागू होणार? टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णयाची शक्यता
Mumbai पालिकेच्या निवडणुकांकडे सध्या लक्ष नाही, Aditya Thackeray यांची माहिती