Diva Railway Station Protest : लोकल पकडताना दिवेकरांचे हाल, आक्रमक होत प्रवाशांचं आंदोलन; मागणी काय?
दिवा रेल्वे स्थानकातून सुटणारी कोणतीच लोकल नसल्याने प्रवाशांना ट्रेनमध्ये चढता येत नसल्याची समस्या दिवेकरांची आहे. आज रेल्वे प्रशासनाचा निषेध दर्शवत असताना मोठ्या संख्येने दिवेकर प्रवासी काळी फिती बांधून प्रवास करणार आहेत. या आंदोलनादरम्यान, कोणताही गैर प्रकार घडू नये, त्याआधी पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील दिवा रेल्वे स्थानकात सकाळीच प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दिवा रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांकडून निषेध आंदोलन करण्यात येत आहे. निषेध आंदोलन करणाऱ्या दिवा रेल्वे प्रवाशांची प्रामुख्याने एकच प्रमुख मागणी आहे ती म्हणजे दिवा ते सीएसएमटी रेल्वे सुरू करण्यात यावी. यासोबत कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना दिवा स्थानकात थांबा द्या, या मागणीसाठी प्रवाशी आंदोलन करत आहेत. रेल्वेतून दाटीवाटीने प्रवास होत असताना, रेल्वेत गर्दी असल्याने चढायला मिळत नसल्याने फलाटावरून रेल्वे गाडी न पकडता त्याच्या विरुद्ध दिशेने रेल्वे प्रवासी चढताना दिसत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात लवकरात लवकर दिवेकरांना स्पेशल ट्रेन दिवा ते सीएसटी आणि कोकणात जाणाऱ्या विशेष गाड्या थांबा देण्यात द्यावा अशी मागणी दिवेकर करत आहे. बघा यासंदर्भातील व्हिडीओ…
Published on: Aug 14, 2024 02:03 PM