महायुतीत मुंबईत 2 जागांवर अद्याप सस्पेन्स, कोणत्या उमेदवारांची होतेय चर्चा? कधी होणार घोषणा?
उज्ज्वल निकम यांच्यासारखा उमेदवार दिल्याने लोकांना चांगला पर्याय मिळाल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. तर दुसरीकडे उत्तर पश्चिम मुंबईमध्ये लेकविरूद्ध बाप प्रचाराच्या मैदानात उतरणार आहे. तर महायुतीकडून उत्तर पश्चिम मुंबईतून आणि दक्षिण मुंबईतून कोणाच्या नावाची होतेय चर्चा?
उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि भाजपकडून उज्ज्वल निकम आमने-सामने आहेत. यादरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी उज्ज्वल निकम यांचं कौतुक केलंय. उज्ज्वल निकमांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे, त्यांच्यावर आक्षेप घेऊच शकत नाही. उज्ज्वल निकम यांच्यासारखा उमेदवार दिल्याने लोकांना चांगला पर्याय मिळाल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. तर दुसरीकडे उत्तर पश्चिम मुंबईमध्ये लेकविरूद्ध बाप प्रचाराच्या मैदानात उतरणार आहे. तर महायुतीकडून उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर तर दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना तिकीट दिल्याने प्रिया दत्त नाराज असल्याची चर्चा होती. मात्र वर्षा गायकवाड यांच्या भेटीनंतर त्यांच्यात कोणतीच नाराजी नसल्याचे स्पष्ट झालंय. दरम्यान, अद्याप महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स कायम असून उमेदवारांची घोषणा कधी? असा सवाल करत याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे.