Kishori Pednekar | केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेनंतर किशोरी पेडणेकर नेमकं काय म्हणाल्या ?

Kishori Pednekar | केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेनंतर किशोरी पेडणेकर नेमकं काय म्हणाल्या ?

| Updated on: Aug 24, 2021 | 8:33 PM

नारायण राणेला झालेली अटक ही एका वाईट प्रवृत्तीला झाल्याचं शिवसैनिकाला त्याबद्दल समाधान असल्याची प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्री पदाची गरिमा घालवली म्हणून त्याला न्यायालयाने जामीन नामंजूर केला.

रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली आहे. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथकं पाठवली होती. त्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी राणेंना अटक केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली खेचली असती अशी भाषा केल्याने नारायण राणेंविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नारायण राणेला झालेली अटक ही एका वाईट प्रवृत्तीला झाल्याचं शिवसैनिकाला त्याबद्दल समाधान असल्याची प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्री पदाची गरिमा घालवली म्हणून त्याला न्यायालयाने जामीन नामंजूर केला. वरूण सरदेसाई ठाकरे कुटुंबाच्या जवळ असले तरी ते पहिले शिवसैनिक आहेत. त्यामुळे त्यांनी रस्त्यावर आंदोलन केलं आणि त्यामुळे ठाकरे कुटुंब रस्त्यावर दिसलं, असेही महापौर पुढे म्हणाल्या.

Video | ही तर लोकशाहीची हत्या, संबित पात्रा यांची राज्य सरकारवर टीका
Nagpur | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक, नागपुरात शिवसेना कार्यकर्त्यांकडून जल्लोष