शिवाजी पार्कवर इटलीचे दिवे, हा योगायोग की ‘इटली’चं लांगुलचालन?, मनसेचा खोचक सवाल

| Updated on: Oct 19, 2021 | 12:57 PM

दादर शिवाजी पार्कात मुख्यमंत्री निधीतून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारे दिवे हे इटलीमधून आयात करण्यात आले आहेत. हा योगायोग आहे की इटलीचं लांगुलचालन आहे? असा खोचक सवाल मनसेने सेनेला विचारला आहे.

मुंबई : दादर शिवाजी पार्कात मुख्यमंत्री निधीतून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारे दिवे हे इटलीमधून आयात करण्यात आले आहेत. हा योगायोग आहे की इटलीचं लांगुलचालन आहे? असा खोचक सवाल मनसेने सेनेला विचारला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करत सेनेवर निशाणा साधला आहे. शिवाजी पार्कवरील दिवे हे इटलीवरुन आयात गेले गेले आहेत. सेनेचं इटली प्रेम यातून दिसून येत आहे. भारतात सुद्धा चांगल्या पद्धतीचे दिवे तयार होत असतात, मग इथल्या दिव्यांचा काय प्रोब्लेम आहे? नेहमी परदेशी कंपनीकडून साहित्य का मागवली जातात?, असे सवाल संदीप देशपांडे यांनी सेनेला विचारला आहे.

vegetable price hike,Mumbai | इंधन दरवाढी असतानाच मुंबईत दिवाळीच्या तोंडावर भाज्यांचे दर गगनाला भिडले
Milk price hike,Nashik | कोजागिरी पौर्णिमेनिमित्त नाशकात दुधाचे भाव वधारले, दूध केंद्रांवर नागरिकांची गर्दी