अंगावर हिजाब… मनात राम… मुस्लिम तरुणी निघाली अयोध्येतील प्रभू रामाच्या दर्शनाला

| Updated on: Dec 26, 2023 | 3:51 PM

अयोध्या येथे २२ जानेवारीला प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने एक मुस्लिम युवती हातात भगवा घेत आपल्या दोन मित्रांसह मुंबई येथून अयोध्येला पायी निघाली

मुंबई, २६ डिसेंबर २०२३ : अयोध्या येथे २२ जानेवारीला प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने एक मुस्लिम युवती हातात भगवा घेत आपल्या दोन मित्रांसह मुंबई येथून अयोध्येला पायी निघाली असून, अयोध्येला जात आहे. आज त्यांच्या यात्रेचा पाचवा दिवस असून नाशिक येथून ते पुढे रवाना झाले. शबनम शेख असे या मुस्लिम युवतीचे नाव असून, रमनराज शर्मा आणि बिनित पांडे असे तिच्या दोन मित्रांचे नाव आहे. रामायण बाबत ऐकत असल्याने प्रभू श्रीराम यांच्या बद्दल आस्था असल्याची प्रतिक्रिया मुस्लिम युवती शबनम शेख यांनी दिली. त्याचप्रमाणे अयोध्या येथे जाऊन प्रभू श्री रामचंद्र यांच्याबद्दल आणखी जाणून घेण्याची भावना तिने व्यक्त केली. तर जानेवारी महिन्यात होणाऱ्या या सोहळ्यासाठी संपूर्ण देशवासीयांना या तीनही मित्रांनी शुभेच्छा दिल्या.

Published on: Dec 26, 2023 03:51 PM
अमोल कोल्हे यांच्या पराभवासाठी अजितदादा गटातून ‘हा’ खंदा पाठीराखा शिरूर लोकसभेची जागा लढवणार?
इम्तियाज जलील यांना इंडिया आघाडीत यायची इच्छा? अंबादास दानवे म्हणाले, त्यांनी यावं…