VIDEO : Nana Patole On Ajit Pawar | अजित पवार पहाटेच्या शपथविधीवर कधी बोलणार याची वाट पाहतोय : नाना पटोले

| Updated on: May 16, 2022 | 12:54 PM

राज्यातील महाविकास आघाडीतील खदखद थेट काँग्रेस हायकमांडच्या दरबारात गेली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधींकडे राष्ट्रवादी विरोधात तक्रार केली आहे. स्वत: नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादीने फोडाफोडी करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत नेले. भिवंडीतही पक्ष फोडला. भंडारा आणि गोंदियात राष्ट्रवादीने भाजपसोबत संधान साधून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला.

राज्यातील महाविकास आघाडीतील खदखद थेट काँग्रेस हायकमांडच्या दरबारात गेली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधींकडे राष्ट्रवादी विरोधात तक्रार केली आहे. स्वत: नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादीने फोडाफोडी करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत नेले. भिवंडीतही पक्ष फोडला. भंडारा आणि गोंदियात राष्ट्रवादीने भाजपसोबत संधान साधून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचं अजूनही भाजपसोबत संधान आहे. सरकारमध्ये असूनही राष्ट्रवादीकडून काँग्रेसला अडचणीत आणलं जात आहे. त्याबाबतची तक्रार सोनिया गांधींकडे केली आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं. तसेच सोनिया गांधी यांनी ही तक्रार ऐकून घेतली आहे. येणाऱ्या काळात त्याचे परिणाम निश्चितच दिसून येतील, असा दावाही नानांनी केला आहे.

Published on: May 16, 2022 12:54 PM
VIDEO : Sadabhau Khot On Ketaki Chitale | केतकी चितळेचा मला अभिमान सदाभाऊ खोत यांचे केतकी चितलेला समर्थन
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 16 May 2022