अभिनेता साहिल खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल; महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप
Bollywood Actor Sahil Khan : ओशिवरा पोलिसांच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी साहिल खान आणि मतिंडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या तपास सुरू आहे. पाहा व्हीडिओ...
मुंबई : अभिनेता साहिल खान याच्याविरुद्ध मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेता आणि व्यावसायिक शरीरसौष्ठवपटू साहिल खान आणि त्याच्या मित्राविरुद्ध मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. एका महिलेला धमकावणं, धमकी देणं आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी अभिनेता साहिल खानविरुद्ध आयपीसी कलम 500, 501, 509, 504, 506 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती ओशिवरा पोलीस ठाण्यातील पोलिसांनी दिली आहे. ओशिवरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या पतीने साहिल खान आणि त्याचा साथीदार मतिंडा यांनी लग्नाच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता.
Published on: Apr 20, 2023 08:41 AM