Mumbai Petrol Diesel Hike | मुंबईकरांच्या खिशाला कात्री, पेट्रोल डीझेलच्या दरात वाढ

| Updated on: Mar 22, 2022 | 10:25 AM

पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तेल कंपन्यांकडून (oil companies) पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यास सुरुवात झाली आहे. 137 दिवसांनंतर पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर जाहीर करण्यात आले आहेत.

पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तेल कंपन्यांकडून (oil companies) पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यास सुरुवात झाली आहे. 137 दिवसांनंतर पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर जाहीर करण्यात आले आहेत. युक्रेन आणि रशिया यूक्रेन यांच्यातील युद्धाच्या परिणामामुळं देखील आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून देखील दरवाढ होतं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीसह आज एलपीजीचे देखील दर वाढले आहेत. राज्यात आज पेट्रोल सर्वाधिक दर परभणी जिल्ह्यात आहेत.तर, सर्वात कमी नागपूर शहरात आहेत. परभणीतील पेट्रोलचा दर 113.50 रुपये तर डिझेलचा दर 96.17 इतका आहे. तर, गुडरिटर्न्स या वेबसाईट नुसार नागपूरमध्ये पेट्रोलचा दर 109.84 इतका आहे. औरंगाबादमध्ये डिझेल 96.71 रुपये लीटर प्रमाणं विकलं जात आहे. तर, सर्वात स्वस्त डिझेल नागपूर शहरात 92.68 वर पोहोचलं आहे.

Published on: Mar 22, 2022 10:25 AM
Mohit Kamboj यांच्या Khushi Paradise इमारतीत अतिरिक्त बांधकाम करण्यात आल्याचा पालिकेला संशय
बेअक्कल माणसाला मी उत्तर देणार नाही- Ameya Khopkar