शीतल म्हात्रे पाठलाग प्रकरणी मोठी अपडेट, ‘ते’ दोघे पोलिसांच्या ताब्यात, कोण आहेत दोघं?
VIDEO | शीतल म्हात्रे पाठलाग प्रकरणात पोलिसांना मोठं यश, दोघे जण पोलिसांच्या जाळ्यात, कोण आहेत आरोपी?
मुंबई : शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांच्या पाठलाग प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश आल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांची दादर पोलिसांकडून कसून चौकशी केली जाणार आहे. सागर चव्हाण आणि स्वप्नील माने असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघेही तरुण हे प्रभादेवी परिसरातील असल्याची माहिती मिळत आहे. दोघेही माहीम विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या युवासेनेचे पदाधिकारी आहेत. दोघांनी शीतल म्हात्रे दादर परिसरातून जात असताना त्यांना हातवारे केले आणि पाठलाग केल्याची तक्रार शीतल म्हात्रे यांनी केली होती. त्याच प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. शीतल म्हात्रे यांच्या गाडीचा पाठलाग केल्याचा आरोप करण्यात आल्याप्रकरणी त्यांनी मुंबई पोलीस सहउपायुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. दरम्यान, आज दादर पोलीस ठाण्यात जावून जबाब नोंदवलेला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.