Mumbai Republic Day : प्रजासत्ताक दिनासाठी मुंबई पोलीस सज्ज, शिवाजी पार्कात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण

| Updated on: Jan 26, 2023 | 8:34 AM

आज देशभरात 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन करत राज्यभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली, मुंबईतील इमारतींना तिरंगा रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करत सरकारी इमारतींना तिरंगी साज चढवल्याचे भासत आहे. तर प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील पोलीस देखील सज्ज झाले आहेत. मुंबई पोलिसांकडून खबरदारी म्हणून मोठा बंदोबस्त करण्यात […]

आज देशभरात 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन करत राज्यभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली, मुंबईतील इमारतींना तिरंगा रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करत सरकारी इमारतींना तिरंगी साज चढवल्याचे भासत आहे.

तर प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील पोलीस देखील सज्ज झाले आहेत. मुंबई पोलिसांकडून खबरदारी म्हणून मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे देखील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यावेळी राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विविध पोलीस विभागीतील पोलीस कर्मचाऱ्यांचे पदसंचलन शिवाजी पार्कवर होणार असून विविध चित्ररथांचा सहभाग देखील याठिकाणी पाहायला मिळणार आहे.

Published on: Jan 26, 2023 08:34 AM
4 कोटी मिळाल्याचा आला मेसेज, पण, बँकेने केली तिची फसवणूक, मग, पोलिसांनी…
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी शिवाजी पार्क सज्ज, पाहा व्हीडिओ…