Video : मनसे कार्यालयाबाहेरील भोंगे पोलिसांनी उतरवले, पाहा व्हीडिओ…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्र सरकारनं मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत निर्णय न घेतल्यास मशिदी समोर हनुमान चालिसा दुप्पट आवाजात लावू, अशा इशारा ठाकरे यांनी दिला होता. यानंतर मनसेच्या चांदिवली विधानसभा मतदारसंघातील महेंद्र भानुशाली यांनी आज सकाळी त्यांच्या कार्यालयाबाहेर भोंगे लावले होते. चिरागनगर पोलिसांनी (Police) […]
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्र सरकारनं मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत निर्णय न घेतल्यास मशिदी समोर हनुमान चालिसा दुप्पट आवाजात लावू, अशा इशारा ठाकरे यांनी दिला होता. यानंतर मनसेच्या चांदिवली विधानसभा मतदारसंघातील महेंद्र भानुशाली यांनी आज सकाळी त्यांच्या कार्यालयाबाहेर भोंगे लावले होते. चिरागनगर पोलिसांनी (Police) मनसे कार्यकर्त्यांना अगोदर समज दिली. पोलिसांनी समज दिल्यानंतरही भोंगे न उतरवल्यामुळं अखेर पोलिसांनी मनसेच्या कार्यालयाबाहेर लावलेले भोंगे उतरवले आहेत. मनसेचे महेंद्र भानुशाली यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती देखील समोर आलं आहे.