राणा दाम्पत्याविरोधात मुंबई पोलीस दोषारोपपत्र दाखल करणार
मुंबई राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. 8 जूनला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई पोलीस या दोघांविरोधात दोषारोपपत्रही दाखल करणार आहेत. र
मुंबई राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. 8 जूनला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई पोलीस या दोघांविरोधात दोषारोपपत्रही दाखल करणार आहेत. रवी राणा आणि नवनीत राणा यांना वांद्रे न्यायालयात हजर राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. हनुमान चालीसा प्रकरणात जेव्हा पोलीस राणा दाम्पत्याच्या घरी गेले होते. तेव्हा आम्ही खासदार आहोत, तुम्ही आम्हाला असं थांबवू शकत नाही, असं म्हणत त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यासंबंधीची ही नोटीस मुंबई पोलिसांनी बजावली आहे.
Published on: Jun 06, 2022 01:43 PM