VIDEO : Pravin Darekar यांचा जामीन मंजूर, कोर्टात नक्की काय झालं?
भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. मुंबई बँक घोटाळ्याप्रकरणी दरेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. या आधी सत्र न्यायालयाने दरेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे.
भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. मुंबई बँक घोटाळ्याप्रकरणी दरेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. या आधी सत्र न्यायालयाने दरेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे. त्यांना 50 हजाराच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. दरेकरांविरोधातील हा एफआयआर चुकीचा होता. त्यात कोणतीही केस दिसून येत नव्हती. दरेकरांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी असं हे प्रकरण नव्हतं. कोर्टानेही त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. कोठडीत घेऊन अटक करण्यासारखी ही केस नसल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.