मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पुन्हा विशेष ब्लॉक, काय कारण? वाहनांना पर्याय कोणता?

| Updated on: Jul 27, 2023 | 2:21 PM

VIDEO | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक, वाहतूक कोणत्या मार्गानं राहणार सुरू?

पुणे : गेल्या आठवड्याभरापासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर २३ जुलै रोजी सततच्या पावसामुळे दरड कोसळण्याची घटना घडली होती. यानंतर पुणे आणि मुंबईकडील वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आला होता. मात्र सातत्यानं हा महामार्ग वाहनांनी रहदारीचा असल्याने तातडीने रस्त्यावरील दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. ही दरड हटवण्याच्या कामासाठी दोन तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. हा ब्लॉक घेऊन महामार्ग सुरळीत करण्यात आला होता. आता पुन्हा हा महामार्ग दुपारी 12 ते 2 या वेळेत बंद ठेवण्यात आला होता. लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी सैल झाल्या आहेत. या सैल झालेल्या दरडी हटवण्याचे काम या दोन तासात करण्यात आले.

Published on: Jul 27, 2023 02:07 PM
मुंबईतील खड्ड्यांवर मनसे ना’राज’; हातात कागदी बोट, शीप घेत केलं अनोख आंदोलन!
अजित पवार मुख्यमंत्री होतील? प्रफुल्ल पटेल यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, ‘ते एक ना एक दिवस…’