Breaking | मुंबई-पुण्यात पहिली ते सातवीचे वर्ग सुरु होणार
पुन्हा एकदा शहरातील शाळेची घंटा वाजणार आहे. पुणे महानगरपालिका हददीतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग येत्या गुरुवारपासून (16 डिसेंबर, 2021) सुरु होणार आहेत. महापौर मुरलीधर मोहळ यांनी बदल नुकतीच माहिती दिली आहे.
पुणे – पुन्हा एकदा शहरातील शाळेची घंटा वाजणार आहे. पुणे महानगरपालिका हददीतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग येत्या गुरुवारपासून (16 डिसेंबर, 2021) सुरु होणार आहेत. महापौर मुरलीधर मोहळ यांनी बदल नुकतीच माहिती दिली आहे. कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करत शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून याची पालकांनी नोंद घ्यावी ,असे मोहळ यांनी म्हटले आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत, विभागीय सौरभ राव , महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासोबत चर्चा करुन हा एकमताने निर्णय घेण्यात आला आहे.
शाळा सुरु करत असताना ज्या काही नियमावली ठरवण्यात आले आहे, मार्गदर्शक नियमावलीनुसार सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण असेल , सोशल डिस्टंस असेल अश्या सर्व सूचना देता तसेच त्याची अंमलबजावणी करत शाळा सुरु केल्या जाणार आहेत. त्यामुळे मागील काहीदिवसापासून शाळां कधी सुरु होणार हा जो प्रश्न होता ? तो आता मार्गी लागला आहे.ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे शहरातील शाळा सुरु करायच्या की नाही? अशी चर्चा सुरू होती. शहरातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊनच शाळा सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्याच बरोबर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही त्या त्या जिल्ह्यातील स्थानिक प्रशासना सोबत चर्चा करुन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल असे म्हटले होते.