Mega Block Update : मुंबईकरांनो…रविवारी लोकलनं प्रवास करताय? बघा कोणत्या मार्गावर असणार मेगाब्लॉक?

Mega Block Update : मुंबईकरांनो…रविवारी लोकलनं प्रवास करताय? बघा कोणत्या मार्गावर असणार मेगाब्लॉक?

| Updated on: Apr 05, 2025 | 11:59 AM

आज आणि उद्या रेल्वेच्या मध्य आणि पश्चिम मार्गावर मेगा ब्लाॉक घेण्यात येणार आहे. आपल्या कामाचे नियोजन या ब्लॉकच्या वेळा बघूनच घरा बाहेर पडा म्हणजे तुमची गैरसोय होणार नाही.

मुंबईकरांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर उद्या मुंबई लोकल ट्रेननं प्रवास करणार असाल तर हा व्हिडीओ एकदा बघा आणि मगच घराबाहेर पडण्याचं नियोजन करा. कारण अभियांत्रिकी कामांमुळे मुंबईतील लोकल ट्रेनच्या पश्चिम रेल्वे मार्ग आणि मध्य रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. आज शनिवारी पश्चिम रेल्वेवर आणि रविवारी मध्य रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी आणि रविवार या दोन दिवस पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यात येणार आहे.

कोणत्या मार्गावर कधी असणार ब्लॉक

मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी-नेरूळ दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ४ वाजून १० मिनिटांपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासह पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते राम मंदिर स्थानकादरम्यान शनिवारी रात्री सव्वा १२ ते पहाटे सव्वा चार वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Published on: Apr 05, 2025 11:57 AM
Gunaratna Sadavarte : ‘…मग तुझ्या राज ठाकरेला सांगतो’, मनसे नेता अन् सदावर्तेंमध्ये बाचाबाची, ऑडिओ व्हायरल
Satish Bhosle : ‘बॉम्ब, हत्यारं घरात टाकून आणि…’, खोक्याला आधी मारहाण अन् आता धमकी, वकिलांकडून मोठी माहिती समोर