Video: मुंबईतल्या समुद्रात 4 मीटरहून अधिक उंचीच्या लाटा, मरीन ड्राईव्ह किनाऱ्यावर पोलीस बंदोबस्त

| Updated on: Jun 13, 2021 | 4:46 PM

समुद्रात आज 4 मीटर हून अधिक उंच लाटा येतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार समुद्रात उंच लाटा पाहायला मिळत आहेत. मरीन ड्राईव्ह किनाऱ्यावर उंच लाटा पाहायला मिळत आहेत. समुद्रकिनारी लोकांनी फिरकू नये यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलाय.

कृष्णा सोनारवाडकर टीव्ही 9 मराठी, मुंबई: समुद्रात आज 4 मीटर हून अधिक उंच लाटा येतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार समुद्रात उंच लाटा पाहायला मिळत आहेत. दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी हायटाईड आहे असं सांगण्यात आलेलं होत. त्यानुसार मरीन ड्राईव्ह किनाऱ्यावर उंच लाटा पाहायला मिळत आहेत. समुद्रकिनारी लोकांनी फिरकू नये यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलाय. मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती. मात्र,  पावसाने विश्रांती घेतलीय आणि कडकडीत ऊन पडलेलं आहे. मुंबईत सकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. दादर, वडाळा, सायन, माटुंगा भागात जोरदार पाऊस झाला. पश्चिम उपनगरात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. तर, काही ठिकाणी रिमझिम पाऊस होता. दुपारनंतर मात्र पावसानं मुंबईत उघडीप दिली. मुंबईत दुपारनंतर उन पडले होते. (Mumbai rain High tides seen at Arabian sea at Marine Drive )

Dombivali मध्ये एका रुपयात एक लीटर पेट्रोल; पेट्रोल पंपावर तरुणांची भली मोठी रांग
50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | पूर्ण पाच वर्षे मुख्यंत्रिपद शिवसेनेकडेच राहील : संजय राऊत