Mumbai Rain | मुंबई वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मुसळधार पाऊस, इस्टर्न एक्सप्रेस हायला नदीचं स्वरुप

| Updated on: Jun 12, 2021 | 11:18 AM

मुंबई वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मुसळधार पाऊस बरसतोय. तर इस्टर्न एक्सप्रेस हायला नदीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढण्यात नागरीकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तर, सायन पुलाखाली प्रचंड पाणी साचले आहे. तसेच सायनपासून ठाण्याकडे जाणारे रस्तेही पाण्याखाली गेले आहेत.| Mumbai Rain Update Heavy Rainfall At Western Express Highway

मुंबईसह उपनगरात सकाळपासूनच जोरदार पाऊस कोसळतोय. त्यामुळे हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आली आहे. तर, ठाणे, मुंबईकरांनी घरातच थांबावे, लांबचा प्रवास टाळावा, गरज असल्यासच घराबाहेर पडा, असा सल्लाही देण्यात आला आहे. मुंबई वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मुसळधार पाऊस बरसतोय. तर इस्टर्न एक्सप्रेस हायवे नदीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढण्यात नागरीकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तर, सायन पुलाखाली प्रचंड पाणी साचले आहे. तसेच सायनपासून ठाण्याकडे जाणारे रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. सायन, दादर, कुर्ला, चुनाभट्टी, धारावी आणि चेंबूर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या ठिकाणी राहणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अंधेरी फाटक आणि सबवेमध्ये पावसाचे पाणी भरले आहे.  | Mumbai Rain Update Heavy Rainfall At Western Express Highway

Nashik | केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर! नाशिकमधील पावसातलं विलोभनीय दृश्य
Headline | 10 AM | नागरिकांसोबत मग्रुरी खपवून घेतली जाणार नाही : नितीन राऊत