बापरे… धक्कादायक… मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं, 100 पेक्षा जास्त जण दबल्याची शक्यता

| Updated on: May 13, 2024 | 6:53 PM

मध्य रेल्वे मार्गावर मुलुंड आणि ठाण्याच्या दरम्यान ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेचे वाहतूक बंद झाल्याने प्रवासी संतप्त झाले. तर दुसरीकडे मुंबईतील दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळल्याची घटना घडल्या. या होर्डींग खाली शंभरहून अधिकजण अडकल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Follow us on

मुंबईत अचानक वातावरणात बदल झाला आणि त्यानंतर सोसट्याचा वारा, मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचा खोळंबा झाला. तर या वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसाचा फटका मुंबईच्या लाईफ लाईनला देखील बसला. मध्य रेल्वे मार्गावर मुलुंड आणि ठाण्याच्या दरम्यान ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेचे वाहतूक बंद झाल्याने प्रवासी संतप्त झाले. तर दुसरीकडे मुंबईतील दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळल्याची घटना घडल्या. वडाळा येथील श्री जी टॉवरजवळ होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. संबंधित घटना कॅमेऱ्यातही कैद झाली असून अतिशय हृदय हेलावणारी ही घटना आहे. यासह वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये भलंमोठं होर्डिंग एका पेट्रोल पंपावर कोसळलं. यामुळे एकच हाहा:कार उडाला. घाटकोपरमधील रमाबाई परिसरात ही घटना घडली. घटना घडताच मोठी नागरिकांची तारांबळ उडाली. या होर्डींग खाली शंभरहून अधिकजण अडकल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, अनेकांनी अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले.