अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन सज्ज राहा, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
मुंबईसह परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यंत्रणांनी सज्ज राहावे, असे आदेश त्यांनी दिले आहेत. (CM Uddhav Thackeray)
मुंबईसह परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. पुढील तीन दिवस पाऊस असेल, असं हवामान विभागानं सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला मुंबईकरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पाण्याचा निचरा तातडीनं करुन, वाहतूक सुरळीत करा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. मुंबई शहर आणि उपनगराच्या परिसरात पहाटेपासून संततधार पाऊस पडताना दिसत आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. हा अंदाज आता काहीप्रमाणात खरा ठरताना दिसत आहे.