VIDEO : Jitendra Awhad यांचा Raj Thackeray यांना सणसणीत टोला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून भाजपमध्ये गेलेले नेते हाजी अराफत शेख यांचा दाखला देत गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं. तुम्ही बोललात की मशिदीत वस्तरा कसा सापडेल, कारण ते दाढीच करत नाहीत, तुम्ही विसरलात का, तुमचा एक मित्र होता.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून भाजपमध्ये गेलेले नेते हाजी अराफत शेख यांचा दाखला देत गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं. तुम्ही बोललात की मशिदीत वस्तरा कसा सापडेल, कारण ते दाढीच करत नाहीत, तुम्ही विसरलात का, तुमचा एक मित्र होता, हाजी अराफत शेख, जो आता भाजपचा अल्पसंख्याक विकास प्रमुख आहे, तो मनसेच्या वाहतूक सेनेचा अध्यक्ष होता. त्याच्या बाजूला बसून तुम्ही कित्येक वेळा जेवायचात, विसरलात का, तो दाढीच करायचा नाही, साफ दाढीचा होता, असं आव्हाड म्हणाले.