Mumbai : मुंबईतील रिक्षा चोरुन सोलापुरात विक्री, 2 आरोपींना मालवाणी पोलिसांकडून अटक

| Updated on: Mar 22, 2022 | 8:24 PM

मुंबई आणि परिसरातून ऑटो रिक्षा चोरुन त्याची नंबर प्लेट बदलून महाराष्ट्रातील अक्कलकोट सोलापूर (Solapur) येथे विकणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना मुंबईच्या मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. मालवणी पोलीस ठाण्यात 11 मार्चला ऑटो रिक्षा चोरीचा एफआयआर नोंदवण्यात आला होता.

मुंबई : मुंबई (Mumbai) आणि परिसरातून ऑटो (Auto) रिक्षा चोरुन त्याची नंबर प्लेट बदलून महाराष्ट्रातील अक्कलकोट सोलापूर (Solapur) येथे विकणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना मुंबईच्या मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. मालवणी पोलीस ठाण्यात 11 मार्चला ऑटो रिक्षा चोरीचा एफआयआर नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी तपास सुरू केला असता ही टोळी ऑटो रिक्षा चोरुन त्यांची नंबर प्लेट बदलून अक्कलकोट सोलापूर येथे विकत असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 14 रिक्षा जप्त केल्या असून, गेल्या तीन महिन्यात या लोकांनी या सर्व रिक्षा चोरल्या आहेत.
काहीही करा झुकणार नाही, Mohit Kamboj यांची मुंबई महापालिकेच्या नोटिशीवर प्रतिक्रिया
zomato बॅायला 10 मिनीटात delivery द्यायला लावण धोक्याचं, रोहित पवारांचा नव्या निर्णयाला विरोध