Mumbai Sena-BJP Clash | राड्यानंतर शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी भाजपसह शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या तब्बल 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.| Mumbai Sena-BJP Clash
राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप युवा मोर्चाने काढलेल्या फटकार मोर्चात मोठा राडा झाला. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी भाजपसह शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या तब्बल 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी आंदोलनादरम्यान झालेल्या गोंधळाप्रकरणी शिवसेनेच्या चंदू झगड़े, राकेश देशमुख, अभय तमोरेंसह इतर 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 143, 147, 149, 392, 324, 323, 354, 509 यांसह विविध कलमांतर्गत दाखल करण्यात आला आहे. | Mumbai Sena-BJP Clash FIR Filed Against 7 shivsena leaders and 30 BJPs leaders