Mumbai | मराठमोळ्या दीपिका मुंडलेंकडून टाटा रूग्णालयाला 120 कोटींची जमीन दान
मुंबईतील टाटा रुग्णालयाला 120 कोटी रुपये किंमत असलेली जमीन दान करण्यात आली आहे. सध्याच्या टाटा रुग्णालयापासून अवघ्या 400 मीटर अंतरावर असलेली ही जमीन एका दानशूर महिलेने देणगी म्हणून दिली आहे. टाटा मेमोरियल रुग्णालय हे कर्करोगग्रस्त रुग्णांवर उपचार करणारे देशातील सर्वात मोठे रुग्णालय आहे.

टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णांची यादी मोठी असते. त्यामुळे अनेकांना वाट पाहत थांबावे लागते. त्यावर उपाय म्हणून मुंबईतील एका दानशूर महिलेने तिच्या मालकीची अंदाजे 120 कोटी रुपये किंमतीची जमीन टाटा रुग्णालयाला केमोथेरपी केंद्र सुरु करण्यासाठी दिली आहे.
Published on: Sep 06, 2021 11:20 AM