लोकं बघत राहिले, व्हिडीओ केला पण मदतीला कुणी धावलं नाही; वसईत भररस्त्यात तरुणीची निर्घृण हत्या

| Updated on: Jun 19, 2024 | 11:33 AM

एका तरूणाने तरूणीची भर रस्त्यात हत्या केली. ही धक्कादायक घटना आरोपीकडून होत असताना एकही जण पुढे आला नाही मात्र लोकं हा धक्कादायक प्रकार आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होते. वसईत प्रेमप्रकरण आणि संशयातून २९ वर्षीय रोहित यादवने २२ वर्षीय आरती यादव या तरूणीच्या डोक्यात लोखंडी पान्ह्याने वार करून हत्या केली

माणुसकी कशी मेली? आणि एका तरूणीसह माणुसकीची हत्या कशी झाली? हेच बघ्यांच्या गर्दीनं मोबाईलमध्ये कैद केलं. वसईमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एका तरूणाने तरूणीची भर रस्त्यात हत्या केली. ही धक्कादायक घटना आरोपीकडून होत असताना एकही जण पुढे आला नाही मात्र लोकं हा धक्कादायक प्रकार आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होते. वसईत प्रेमप्रकरण आणि संशयातून २९ वर्षीय रोहित यादवने २२ वर्षीय आरती यादव या तरूणीच्या डोक्यात लोखंडी पान्ह्याने वार करून हत्या केली. वसईच्या गावराई पाडा परिसरात भर रस्त्यात रोहित यादवने तरूणीची हत्या केली. हा आरोपी तरूणीवर सपासप वार करत लोकं आपल्या गाड्या थांबवून बघत राहिले काहींनी तर व्हिडीओ केला पण त्यातील एकानेही त्या तरूणीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. लोकांनी थरारक प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला अन् तरूणीने आपला जीव गमावला… नेमका काय घडला प्रकार बघा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jun 19, 2024 11:33 AM
महायुतीला हानी, अजितदादा पराभवाचे धनी? सोबत आलेले चुकले की सोबत घेणारे चुकले?
Police Bharti 2024 : ना डॉक्टरी चालत, ना वकिली… कॉन्स्टेबल बनण्यासाठी कोण-कोण आलं?; राज्यात मेगा पोलीस भरती सुरू