ठरलं तर मग! वानखेडे स्टेडियममधील ‘ती’ जागा महेंद्रसिंह धोनीच्या नावाने ओळखली जाणार

| Updated on: Apr 04, 2023 | 9:50 AM

CSK vs Mumbai Indians : 8 एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर आयपीएलचा CSK विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना होणार आहे. हा यंदाच्या आयपीएलचा मुंबईतील पहिला सामना आहे. त्यामुळे सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांची वानखेडे स्टेडियमवर तुफान गर्दी होणार आहे. या दिवशी धोनी ही ऐतिहासिक घोषणा करणार आहे.

मुंबई : वानखेडे स्टेडियममधील ती जागा ऐतिहासिक होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी ही खास घोषणा करणार आहे. MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. 8 एप्रिलला वानखेडे स्टेडियम येथे स्वतः त्या जागी घोषणा करणार आहे. 2011 साली झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात MS धोनी वानखेडे स्टेडियम येथे स्वतःच्या फलंदाजीत ऐतिहासिक षटकार ठोकला होता. त्या षटकाराचा चेंडू स्टेडियममध्ये ज्या जागी पडला ती जागा यापुढे महेंद्रसिंह धोनी च्या नावाने ओळखली जाणार आहे. श्रीलंकेविरुद्धचा तो अंतिम सामना जिंकत भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, असं अमोल काळे यांनी सांगितलं आहे.

Published on: Apr 04, 2023 09:50 AM
महाविकास आघाडीकडून दंगल घडविण्याचा प्रयत्न होतोय; छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीनंतर भाजप नेत्याचा आरोप
‘दुचाकींचे शहर’ पुण्याची नवी ओळख; पुणेकरांकडे किती दुचाकी वाहनं?