मुंबईत पावसाचा हाहा:कार; रस्ते जलमय , वाहतूक विस्कळीत, परळ परिसरातून थेट Live
मुंबईत काल मध्यरात्रीपासून पावसाने हाहाकार उडवला आहे. मध्यरात्रीपासून कोसळणार्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबलं आहे.
मुंबईत काल मध्यरात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पाणी साचले आहे. ज्यामुळे संपूर्ण रस्ते जलमय झाले आहेत. परळ, हिंदमाता परिसरात पाणी साठल्याने जनजीवन विस्कळीत आले आहे. पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने पाण्याचा निचरा होऊ लागला आहे. मात्र अनेक ठिकाणी अजूनही पाणी असल्याने पालिका प्रशासनाची डोकेदुखी कायम आहे.