ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर मुंबईकरांना पाणी कपातीचे संकट, काय आहे कारण?

| Updated on: Apr 28, 2023 | 10:58 AM

VIDEO | मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, उन्हाळ्याच्या तोंडावर पाणी कपातीचं संकट; काय आहे पाणी कपात करण्यामागचं कारण?

मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांध्ये आता केवळ २६.६० टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मुंबईकरांना ऐन उन्हाळ्याच्या सुरूवातीला पाणी कपातीच्या संकंटाला तोंड द्यावं लागणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात येतंय. पावसाळा सुरू होईपर्यंत मुंबईकरांसमोर पाणी कपातीचं संकट असणार आहे. त्यामुळे मुंबईकर नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. गेल्या वर्षीचा विचार करता मागील वर्षाच्या तुलनेत ३ टक्के पाणीसाठी धरणांमध्ये शिल्लक असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, यंदा कमी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. यासाठी मुंबईला अतिरिक्त साठा मिळावा, अशी मागणी मुंबई महापालिकेने राज्य सरकारला केली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट येणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. मुंबईच्या भोवताली जरी समुद्र असला तरीही मुंबईला पाणीपुरवठा करणारे स्त्रोत काही मोजकेच आहे. मुंबईला सात धरणाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. विहार, तुळशी, तानसा, भातसा, मोडक, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा अशा धरणांचा समावेश आहे. तर यासातही धरणांमध्ये फक्त २६ टक्के पाणी साठा केवळ मुंबईकरांसाठी शिल्लक राहिल्याचे सांगितले जात आहे.

खर्गे तर बरोबरचं बोलले, साप हा चौकिदार, मग पोटात दुखायचं काय काम?; राऊत यांची भाजपवर टीका
आज कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चंद्रपुरात काय स्थिती? पाहा व्हीडिओ…