मुंबईत हवेची गुणवत्ता खालावली, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक

| Updated on: Oct 09, 2024 | 5:27 PM

Mumbai Weather : मुंबईत हवेची गुणवत्ता ही दिवसेंदिवस खालावत जात असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाजीनगर आणि वांद्रे-कुर्ला संकुलमधील हवा 'वाईट' श्रेणीत असून वांद्रे-कुर्ला संकुलमधील हवा गुणवत्ता निर्देशांक २३८ वर पोहोचला आहे. तर शिवाजीनगरमधील हवेचा गुणवत्ता निर्देशांक २५२ वर पोहोचला आहे.

मुंबईत सध्या ऑक्टोबर हिटचे चटके आणि धूरकट वातावरणासह पावसाचेही कमबॅक असं काहिसं वातावरण अनुभवायला मिळत आहे. मुंबईकरांना आज संमिश्र वातावरणाचा अनुभव अनुभवायला मिळत असून ऊन, पाऊस, धूळ एकत्र आल्याने आरोग्यासाठी हे घातक ठरत असल्याची चर्चा होतेय तर दुसरीकड हवेची गुणवत्ता खराब व्हायला सुरुवात झाली आहे. मुंबईत आज सर्वदूर धूरकट वातावरण आहे, धूराची चादर सर्वत्र शहरावर पसरली आहे. तर दृष्यमानताही अंशता कमी झाली आहे. एयर क्वालिटी इंडेक्स हा १०५ वर पोहोचला आहे. त्यामुळे हवा खराब झाली आहे. कोलाबा इथे हा १२७ आहे. तर वरळी इथे १४४ आहे. बांद्रा बीकेसी एक्युआय १५१ आहे. कुर्ला इथे ९७ तर विले पार्लेत १३७ इतका आहे. परतीच्या पाऊसामुळे आणि ऑक्टोबर हिटमुळे वातावरणात सध्या बदल होत आहेत. मुंबईतील वायू प्रदूषण ही सध्या चिंतेची बाब आहे.

Published on: Oct 09, 2024 05:27 PM