Mumbai Weather : मुंबईकरांनो काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खालावली, बघा कितीवर पोहोचला AQI?

| Updated on: Nov 28, 2024 | 1:34 PM

मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावली असून एक्युआय हा ११८ वर पोहोचला आहे. मुंबईची हवेची गुणवत्ता हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर बिघडते. त्यातच मंगळवारी मुंबईमधील नीचांकी तापमान हे १६.८ अंश इतक होत याची नोंद हवामान खात्याकडून करण्यात आली आहे

मुंबईत हवेची गुणवत्ता पुन्हा खराब स्थितीत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावली असून एक्युआय (Air Quality Index) हा ११८ वर पोहोचला आहे. मुंबईची हवेची गुणवत्ता हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर बिघडते. ‘वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट २०२३’ च्या नुसार, जानेवारी २०२३ मध्ये मुंबईतील PM २.५ पातळीमध्ये २०२२ च्या तुलनेत २३ टक्के इतकी वाढ झाली होती. यामुळे मुंबई हिवाळ्यात जगातील सर्वाधिक प्रभावित शहरांपैकी एक ठरली आहे. यावर प्रशासनाने योग्य पावलं ऊचलणं बंधनकारक आहे. त्यात मंगळवारी मुंबई मधील गेल्या आठ वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद ही हवामान खात्याकडून नोंदवण्यात आली आहे. मंगळवारी मुंबईमधील नीचांकी तापमान हे १६.८ अंश इतक होत याची नोंद हवामान खात्याकडून करण्यात आली आहे. अश्या प्रकारचं थंडीच वातावरण पुढील काही दिवस असणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. या परिस्थितीनंतर मुंबईची हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रादेशिक एअरशेड धोरणाची गरज असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. स्थानिक प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी मुंबईला तटीय एअरशेडमध्ये समाकलित करण्याचा प्रस्ताव एका देशव्यापी अभ्यासाने मांडला आहे. यानुसार, या प्रादेशिक एअरशेडद्वारे शहरी आणि ग्रामीण प्रदूषण स्रोतास प्रभावीपणे नियंत्रित केलं जाऊ शकतं, असं अभ्यासकांचं मत आहे.

Published on: Nov 28, 2024 01:34 PM