#Tv9podcast | कांकधी भाऊ-बहीण, तर कधी मामा-भाची, संपत्तीसाठी बंटी-बबलीने अनेना लुटलं
अरुणकुमार टिक्कू (Arun Tikku) आणि करण कक्कड (Karan Kakkad) दुहेरी हत्याकांडाने 2012 मध्ये देशात खळबळ उडाली होती. विजय पालांडे आणि त्याची पत्नी-मॉडेल सिमरन सूद (Simran Sood) हत्या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार होते.
अरुणकुमार टिक्कू (Arun Tikku) आणि करण कक्कड (Karan Kakkad) दुहेरी हत्याकांडाने 2012 मध्ये देशात खळबळ उडाली होती. विजय पालांडे आणि त्याची पत्नी-मॉडेल सिमरन सूद (Simran Sood) हत्या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार होते. सिमरनचा हनीट्रॅप प्रमाणे वापर करुन मार्च 2012 मध्ये 28 वर्षीय उदयोन्मुख निर्माता करणकुमार कक्कड, तर एप्रिल 2012 मध्ये 67 वर्षीय व्यावसायिक अरुणकुमार टिक्कू या दोघांच्या मुंबईत हत्या करण्यात आल्या होत्या. दोघांचीही मालमत्ता हडपण्याच्या उद्देशाने त्यांचे जीव घेण्यात आले होते. पालांडेने आपले साथीदार धनंजय शिंदे आणि मनोज गजकोश यांच्या मदतीने या हत्या केल्याचा आरोप होता.