बीडमध्ये एकीकडे मुंडे समर्थकांचे राजीनामे, तर दुसरीकडे राणे समर्थकांचा जल्लोष
बीडमध्ये एकीकडे मुंडे समर्थक राजीनामा देत आपली नाराजी व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे राणे समर्थक नारायण राणे यांना मिळालेल्या कॅबिनेट मंत्रिपदानिमित्त जल्लोष करताना दिसत आहेत.
खासदार प्रीतम मुंडे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळ विस्तारात जागा न दिल्यानं मुंडे समर्थकांमध्ये चांगलीच नाराजी निर्माण झालीय. त्यामुळेच बीडसह राज्यातील अनेक ठिकाणी मुंडे समर्थक भाजप पदाधिकारी आपल्या पक्षीय पदांचा राजीनामा देत आहेत. बीडमध्ये एकीकडे मुंडे समर्थक राजीनामा देत आपली नाराजी व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे राणे समर्थक नारायण राणे यांना मिळालेल्या कॅबिनेट मंत्रिपदानिमित्त जल्लोष करताना दिसत आहेत. त्यामुळे हा जल्लोष मुंडे समर्थकांच्या जखमेवरील खपली काढण्याचा तर प्रकार नाही ना अशी चर्चा होतेय. त्यामुळे बीडमधील राजकीय पारा चांगलाच चढलाय. | Munde supporter resign but Rane support celebration in Beed
Published on: Jul 10, 2021 11:56 PM