VIDEO : Mumbai | Navneet Ravi Rana यांच्या घरी ऑडिट करण्यासाठी महापालिकेची टीम दाखल

| Updated on: May 30, 2022 | 1:28 PM

आज नवनीत राणा यांच्या घरासह संपुर्ण इमारतीचं ऑडिट होणार आहे. मुंबई महापालिकेची टीम या इमारतीचं ऑडिट करणार आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणी हे ऑडिट होणार आहे. यापुर्वी बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी घरात अनधिकृत बांधकाम झाल्याचं स्पष्ट केलं होतं. ते तात्काळ हटवावं नाहीतर महापालिका ते हटवेल असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.

बीएमसीकडून (BMC) नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांनी त्यांच्या घरात अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप केला होता. तसेच राणा दाम्पत्याकडून त्यावर लेखी उत्तर मागितलं होतं. नोटीस बजावल्यानंतरही उत्तर न मिळाल्याने बीएमसीचं पथक आज नवनीत राणाच्या खारमधल्या घरी दाखल झालं आहे. आज नवनीत राणा यांच्या घरासह संपुर्ण इमारतीचं ऑडिट होणार आहे. मुंबई महापालिकेची टीम या इमारतीचं ऑडिट करणार आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणी हे ऑडिट होणार आहे. यापुर्वी बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी घरात अनधिकृत बांधकाम झाल्याचं स्पष्ट केलं होतं. ते तात्काळ हटवावं नाहीतर महापालिका ते हटवेल असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. आम्ही कसल्याही प्रकारचं बांधकाम केलेलं नाही. तसेच विकासकाने बांधकाम केलं आहे असं नवनीत राणा यांनी मीडियाला सांगितलं होतं.

Published on: May 30, 2022 01:28 PM
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 30 May 2022
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 30 May 2022